(रत्नागिरी)
तालुक्यातील भिम युवा पँथर संघटनेच्या वतीने मंगळवारी (दिनांक 26/11/2024 रोजी) अमृत महोत्सवी संविधान गौरव दिनानिमित्त शहरातील आंबेडकरवाडी बौद्धविहार येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान, संघटनेचे अध्यक्षस्थानी अमोल जाधव होते. तर कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथील संविधान अभ्यासक प्रकाश नाईक हे प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून उपस्थित होते.
तसेच भारतीय बौद्धमहासभेचे जिल्हाध्यक्ष एल. व्ही.पवार, बौद्धजन पंचायत समितीचे तालुका खजिनदार मंगेश सावंत यांची विशेष मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली. प्रमुख उपस्थिती म्हणून बौद्धजन कमेटी आंबेडकरवाडीचे अध्यक्ष, आशुतोष कांबळे, सचिव, सचिन जाधव, परटवणे अशोक नगरचे अध्यक्ष दिपक आयरे, मार्गदर्शक संजय आयरे गुरुजी, भिम युवा पँथरचे कार्याध्यक्ष किशोर पवार, सचिव नरेश कांबळे, कोषाध्यक्ष तुषार जाधव, सल्लागार मंगेश पवार, सहसचिव मंगेश जाधव, कार्यकारिणी सदस्य,समिर जाधव, रुपेश कांबळे, निशाद आंबुलकर, धिरज पवार, निखिल सावंत, राजेश मोहिते, ॲड.प्रवीण कांबळे, भा.बौ.महासभेचे माजी तालुकाध्यक्ष रत्नदिप कांबळे, दोन्ही महिला कमेटीच्या अध्यक्ष, सचिव, तसेच,आंबेडकरवाडी, परटवणे अशोक नगर, पंचशील वसाहत, राहुल कॉलनी येथील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले.