(रत्नागिरी)
शैक्षणिक वर्ष 2025- 26 कालावधीसाठी विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्यासाठी विद्यार्थी निवडणुका आयोजित करण्यात आली होती. एकूण ४१ विद्यार्थी प्रतिनिधीमधून साई सूर्यकांत जिरोळे आणि सुमित मिलिंद पाध्ये विद्यार्थी सचिव पदासाठी अर्ज दाखल केला होता.
आज झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण ४१ पैकी ३६ जणांनी मतदान केले . एक मतदान बाद झाले. साई सूर्यकांत जिरोळे ( M.Com 2) याला १७ मते मिळाली आणि सुमित मिलिंद पाध्ये (TYBSC) याला १८ मते मिळाली.
सुमित मिलिंद पाध्ये यांची विद्यार्थी सचिव पदी निवड झाली असे निवडणूक अधिकारी डॉ.आनंद आंबेकर यांनी जाहीर केले. निवडणूक प्रकियेसाठी डॉ. अश्विनी देवस्थळी प्रा.अमोल सहस्रबुद्धे, प्रा.अंकित सुर्वे यांनी सहकार्य केले. विद्यार्थी सचिव सुमित मिलिंद पाध्ये यांचे प्राचार्य डॉ . मकरंद साखळकर यांनी अभिनंदन केले. प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये ,वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ.सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

