(पालघर)
विरारमध्ये एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी मारून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थीनीचे नाव रिचा पाटील (वय 19) असून, ती विवा कॉलेजमध्ये बीकॉम प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. ती विरारच्या नाना नानी पार्क येथे राहत होती. मिळालेली माहितीनुसार, बाबा घरात असतानाच तिने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेऊन जीवन संपवलं. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. रिचाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल आलं. मात्र तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
आत्महत्येचे कारण
रिचा पाटीलच्या आत्महत्येच्या मागील धक्कादायक कारण समोर आले आहे. तिच्या कुटुंबीयांच्या माहितीप्रमाणे, तिच्या कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी तिला धमकी देत तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. तसेच, रिचाचे फोटो मॉर्फ करून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. या धमक्यांमुळे ती मानसिक तणावाखाली आली होती. संबंधित मुलाविरोधात रीचाने कॉलेडच्या प्राचार्यांकडेदेखील तक्रार केली होती.
जेव्हा हा सगळा प्रकार असह्य झाला तेव्हा तिने वडिलांना मुलाबद्दल सांगितले. वडिलांनी कॉलेजमध्ये जावून संबंधित तरुणाला जाब विचारला होता. तेव्हा संतापलेल्या त्या मुलाने काही मुलांना आणून रिचाच्या वडिलांना मारहाण केली. कॉलेज व्यवस्थापनाने या प्रकरणात मुलांना समज दिली होती, परंतु कॉलेजच्या बाहेर त्यांनी पुन्हा रिचाला त्रास देत तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्या आई-वडिलांबाबतही अपशब्द वापरले. यामुळे रिचा खूप खचली होती.
तिच्या वडिलांसोबत ती घरी आल, मात्र बाबा काही कामानिनित्त बाहेर गेल्यावर मानसिक ताण सहन न झाल्याने, रिचाने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी मारून आपले जीवन संपवल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर विरार पोलिसांनी चार तरुण आणि एका तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सध्या तपास सुरू आहे.

