(दापोली)
दापोलीत विनापरवाना गुरांची वाहनातून वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात ४ संशयीताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली शहरातील बुरोंडी मार्गावरील लाल कट्टा परिसरात गुरांची बेकायदा वाहतूक करणारा एक टेम्पो गुरुवार (ता.२७) रोजी रात्री 8 च्या सुमारास जमावाने अडविल्याची माहिती दापोली पोलसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून चौकशी केली असता त्यांना तेथे एमएच.०८.एपी.१५८१ क्रमांकाचा एक टेम्पो आढळून आला. या टेम्पोच्या हौद्यात सुमारे साडेतीन वर्षाचा एक बैल, ७ वर्षाची एक गाय व दोन महिन्याचा एक पाडा आढळून आला.
या गाडीचा चालक देवेंद्र रवींद्र झगडे, रा. गिम्हवणे तेलीवाडी याचेकडे पोलिसांनी गुरांची वाहतूक करण्याचा परवाना आहे का याची विचारणा केली असता त्याने तो नसल्याचे सांगितले. चालकासोबत गोरखनाथ मधुकर शिंदे रा. शिरखल गाववाडी व सदानंद विठोबा जाधव, रा. शिरसोली जाधववाडी हे होते. त्यांनी सदरची गुरे करजगाव येथील बागकर यांचेकडून विकत घेवून असून ती वेळवी येथील अमित अशोक मिरगल यांचेकडे विकण्यासाठी ते जात असल्याची माहिती पोलिसांना दिली.
गुरांची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात देवेंद्र रवींद्र झगडे, गोरखनाथ मधुकर शिंदे, सदानंद विठोबा जाधव व अमित अशोक मीरगल या संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक राजकुमार यादव अधिक तपास करत आहेत.