(रत्नागिरी)
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जय प्रणोती राजेंद्र रांगणकर याने उल्लेखनीय यश संपादन केले असून त्याची निवड पडवे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील नवोदय विद्यालयात झाली आहे.
जय हा पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथील विद्यार्थी असून त्याच्या या यशात शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. त्याला वडील श्री. राजेंद्र रांगणकर (प्राथमिक शिक्षक), आई प्रणोती रांगणकर तसेच आप्तेष्ट व मित्रमंडळींचा मनोबल वाढविणारा पाठिंबा लाभला.
परिश्रम, चिकाटी आणि शिस्तीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. जयच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

