(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
कोकण आयुर्वेदच्या वतीने कडवई येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य, रोगनिदान व उपचार शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या आरोग्य शिबिरात नाडी परीक्षण, गुडघ्याच्या आणि मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी, वरिष्ठ नागरिकांसाठी मधुमेह तपासणी तसेच आहार आणि योगासनांचे मार्गदर्शन देण्यात आले. यासोबतच इलेक्ट्रोथेरपी, अॅक्युपंक्चर, कपिंग थेरपी, कायरोप्रॅक्टिक, मोक्सा ट्रीटमेंट, कायरोगन ट्रीटमेंट आदी विविध आधुनिक व पारंपरिक उपचार पद्धतींनी तपासणी व उपचार करण्यात आले.
शिबिरामध्ये डॉ. ऋतुजा दोरके प्रथमेश सूर्यकांत नलावडे (कायरोप्रॅक्टिशनर), प्राची घाग (नलावडे) (अॅक्युपंक्चरिस्ट), सूर्यकांत आत्माराम नलावडे (नाडी तज्ज्ञ), डॉ. सत्यनारायण जयस्वारा (गुडघे स्पेशालिस्ट), डॉ. चंद्रकांत यडगुडकर (वातरोग तज्ज्ञ) आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला व रुग्णांची तपासणी केली.
या शिबिरानंतर कडवई येथे दर मंगळवारी मोफत आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शिबिराबाबत बोलताना आयोजक सूर्यकांत नलावडे म्हणाले, “कोकण आयुर्वेद स्पाईन व पॅरालिसिस ट्रीटमेंट रिहॅबिलिटेशन सेंटर, कडवई व सावर्डे येथे मणक्याच्या आणि गुडघ्याच्या आजारांवर मॅन्युअल थेरपी व ओझोन उपचाराद्वारे रुग्णांवर उपचार केले जातात. शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना योग्य व मोफत उपचार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

