(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल बाजारपेठेत रविवारी सकाळपासून एक मोकाट जनावर एकाच ठिकाणी बसून असल्याचे काही ग्रामस्थ व दुकानदारांच्या लक्षात आले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनावर त्या ठिकाणाहून न हलल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेचा फोटो काही ग्रामस्थांनी काढून सोशल मीडियावर प्रसारित केला, तसेच स्थानिक पत्रकारांनाही कळविण्यात आले. या माहितीची दखल घेत राजापूर पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किनरे यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. त्यांनी मिळंद गावचे पशुपालक पर्यवेक्षक अतिश शिंदे यांना घटनास्थळी जाऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
संध्याकाळी सुमारे सात वाजता पर्यवेक्षक अतिश शिंदे आणि कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन त्या जनावरावर आवश्यक उपचार आणि काळजी घेण्याची कार्यवाही केली. या वेळी पांगरी गावचे सरपंच अमर जाधव, जयू नारकर, मनोहर गोरुले, बंधू लब्दे, देवानी भाऊ वायकूळ, बाबा वायकूळ, प्रशांत सागरे, सचिन आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले.
उपाययोजना केल्यानंतर दिवसभर एकाच जागी बसलेले जनावर शेवटी उभे राहिले. मात्र, त्या जनावराचा मालक कोण आहे हे शोधण्याचे काम सुरू होते.

