(मंडणगड)
मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन उद्या रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे शुभहस्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. भूषण रामकृष्ण गवई करणार आहेत.
सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर, उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वीकारले असून, कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, नगरविकास, गृहनिर्माण व सार्वजनिक उपक्रम मंत्री, श्री. उदय सामंत, उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच पालक मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे न्यायमूर्ती श्री. मकरंद कर्णिक आणि श्री. माधव जामदार देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच, मंत्र्यांचे श्री. योगेश कदम सुद्धा सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी होतील.
हा समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगड येथे आयोजित केला गेला आहे. मंडणगड तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील न्यायालयीन यंत्रणेसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून विनोद यशवंतराव जाधव, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी; अॅड. मिलिंद लोखंडे, अध्यक्ष, वकील संघ, मंडणगड; तसेच सौ. अमृता जोशी, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग-1, मंडणगड यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कायदा क्षेत्रातील वर्तुळांत हा सोहळा मंडणगड न्यायव्यवस्थेच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

