(रत्नागिरी)
हातखंबा येथील गुरूवर्य अ.आ. देसाई माध्यमिक विद्यालय व श्रीकांत ऊर्फ भाईशेठ मापुस्कर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तालुका क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आज पार पडलेल्या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी कौशल्य दाखवत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.
प्राप्त यश:
110 मीटर हार्डल्स (मुले) – अंकित विश्वनाथ कळंबटे (इ.10 वी) प्रथम, प्रथमेश संजय होरंबे (इ.11 वी) द्वितीय
गोळा फेक – प्रणव अनिल रेवाळे (इ.12 वी) द्वितीय
लांबउडी – वेदांत संतोष गराटे (इ.11 वी) द्वितीय
उंचउडी – वेदांत संतोष गराटे (इ.11 वी) प्रथम, आर्यन सुधाकर पवार (इ.11 वी) द्वितीय
१४ वर्षे वयोगट लांबउडी – नवीन सुधाकर गराटे (इ.8 वी) तृतीय
थाळीफेक – सुरज सुधाकर गराटे (इ.12 वी) द्वितीय
भालाफेक – सुजल सदाशिव गोताड (इ.12 वी) तृतीय
या सर्व खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. या यशामागे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. कुराडे के.एम. व प्रा. काळुखे डी.बी. यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य श्री. धोंगडे बी.डी. यांनी खेळाडूंना सातत्याने प्रेरणा देत त्यांचे मनोबल उंचावले. स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल प्राचार्यांनी सर्व खेळाडू व क्रीडाशिक्षकांचे अभिनंदन केले.

