(मुंबई)
इंटरनेट मूव्ही डेटाबेस (IMDb) ने भारतीय चित्रपटसृष्टीच्या मागील २५ वर्षांच्या रँकिंगवर एक विशेष अहवाल जारी केला आहे. यात २००० ते २०२५ या कालावधीतले लोकप्रिय चित्रपट तसेच गेल्या दशकात सर्वाधिक शोधले गेलेल्या भारतीय सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीत दीपिका पदुकोण पहिल्या क्रमांकावर झळकली आहे. शाहरुख खान दुसऱ्या, तर ऐश्वर्या राय बच्चन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आलिया भट्ट चौथ्या, तर दिवंगत इरफान खान पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. आमिर खान सहाव्या, दिवंगत सुशांत सिंह राजपूत सातव्या, सलमान खान आठव्या, हृतिक रोशन नवव्या आणि अक्षय कुमार दहाव्या क्रमांकावर आहेत.
दीपिकाची प्रतिक्रिया
यादीत नंबर वन ठरल्यानंतर दीपिका पदुकोणने आपली भावना व्यक्त करताना म्हटले, “माझ्या करिअरच्या सुरुवातीला मला अनेकदा सांगितले जायचे की, एका महिलेने आपलं करिअर कसं घडवावं किंवा यशस्वी होण्यासाठी तिच्याकडून काय अपेक्षित आहे. मात्र, मी नेहमीच प्रश्न विचारण्यास, लोकांना अस्वस्थ करण्यास, अधिक कठीण मार्ग स्वीकारण्यास आणि ठरावीक चौकटी मोडून स्वतःचा मार्ग शोधण्यास तयार होते. त्यामुळेच आज या स्थानावर पोहोचले आहे,” असे दीपिकाने सांगितले.
दरम्यान, २००० ते २०२५ पर्यंतच्या लोकप्रिय चित्रपटांचा विचार केला तर, अहवालानुसार, २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला “सैयारा” हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. विकी कौशलचा “छावा” हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. “महावतार नरसिंह” तिसऱ्या क्रमांकावर, “ड्रॅगन” चौथ्या क्रमांकावर आणि “कुली” पाचव्या क्रमांकावर आहे. तथापि, गेल्या २५ वर्षांत संकलित केलेल्या या यादीत, टॉप सात चित्रपटांपैकी सात चित्रपट शाहरुख खानचे आहेत.

