(रत्नागिरी / मंडणगड)
मंडणगड परिसरातील व्यापारी अजीम हमीद कडवेकर (वय ४४, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांना दीर्घकाळ चाललेल्या फसवणुकीचा सामना करावा लागला आहे. ही घटना दिनांक १४ जुलै २०२२ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडणगड परिसरातील व्यापारी अजीम हमीद कडवेकर यांनी संशयित आरोपी चेतन गुलाबराव कोंडे (रा. नांदगाव नाते, जि. रायगड; कागदपत्रावर शिवापूर, ता. हवेली, रा.खेड, जि.पुणे) यांच्या के.के. मल्हार डेअरी खात्यावर एकूण १० लाख रुपये पाठविले. तसेच एक लाख सत्तर हजारांचा व्यवसायासाठी लागणारा दगड (चिरा) दिला होता.
संशयिताने “आज देतो, उद्या देतो” असे वारंवार सांगून पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. यामुळे अजीम कडवेकरांना एकूण ११,७०,०००/- (अकरा लाख सत्तर हजार) रुपये गमावावे लागले. या फसवणुकीबाबत मंडणगड पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंडसंहिता २०२३ चे कलम ३१४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

