(मुंबई)
शुगर डॅडी ही संकल्पना गेल्या काही दशकांत पश्चिमी देशांमध्ये प्रचलित झाली आहे आणि आता भारतातही हळूहळू या नको त्या ट्रेंडचे प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण मुलींना या प्रकारच्या नात्यांमध्ये आकर्षण का वाटते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ‘शुगर डॅडी’ आणि ‘शुगर बेबी’ या संज्ञा समजून घेणे गरजेचे आहे.
शुगर डॅडी म्हणजे असा पुरुष, जो आपल्या वयापेक्षा खूप लहान असलेल्या तरुण मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असतो आणि तिला आर्थिक सहाय्य करतो. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्या मुलीच्या सर्व गरजा पूर्ण करतो. या रिलेशनमध्ये त्याच्यासोबत असणाऱ्या मुलीला शुगर बेबी म्हटले जाते.
हा ट्रेंड वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. हल्ली अनेक तरुणी महागड्या लाईफस्टाइल आणि करीअरच्या स्पर्धेत स्ट्रेसमध्ये असतात. अशा परिस्थितीत शुगर डॅडी त्यांच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करतो. या नात्यांमध्ये कोणतेही भावनिक बंधन नसते, तर काही नियम आणि लिमिट्स ठरवल्या जातात. त्यामुळे लोकांना यामध्ये आकर्षण वाटते. हायफाय लाईफस्टाइलची इच्छा, महागडी गाड्या, ब्रँडेड कपडे आणि इतर सुविधा सहज मिळणे यामुळेही तरुणी शुगर डॅडीकडे आकर्षित होतात.
तरुणींना शुगर डॅडी आकर्षक का वाटतो, याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक सुरक्षितता आणि सोयीनुसार जीवन जगण्याची संधी. ज्यांना दिवसरात्र ऐकून घेणारा, मर्जीप्रमाणे जगू देणारा, वेळप्रसंगी मार्गदर्शन करणारा आणि आर्थिक सहाय्य करणारा पुरुष मिळतो, त्यांच्यासाठी शुगर डॅडी आकर्षक असतो. काही तरुणी आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, तर काही लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी शुगर बेबी होतात.
शुगर डॅडी हे पुरुष त्यांच्या लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांच्या पत्नी किंवा जोडीदाराकडून समाधान न मिळाल्यामुळे अशा नात्यात येतात. काही वेळा या नात्यात आर्थिक आणि लैंगिक संबंधांच्या पलीकडे इमोशनल कनेक्शनही निर्माण होते.
शुगर डॅडी आणि शुगर बेबी या नात्यांचा नवा ट्रेंड आधुनिक डेटिंगमध्ये सध्या भारतात लोकप्रिय होत आहे. या नात्यात आर्थिक सुरक्षा, स्वतंत्रता आणि रिलेशनशिपची लवचिकता या तीन गोष्टी प्रमुख आकर्षक ठरतात. आजकाल तरुणी आणि पुरुष या रिलेशनमध्ये विविध अपेक्षा घेऊन येतात, ज्यामुळे हे पारंपरिक डेटिंगपेक्षा अधिक खुल्या आणि आधुनिक स्वरूपाचे बनत चालले आहे. अशा प्रकारचे नाते जगभरातील प्रामुख्याने शहरी भागात वाढत असून, हे मुख्यत्वे महागड्या लाईफस्टाइलची इच्छा, आर्थिक सुरक्षा आणि लैंगिक समाधान यामुळे प्रेरित असते. त्यामुळे शुगर डॅडी व शुगर बेबी या आधुनिक डेटिंगच्या जगात एक विचित्र ट्रेंड नावारुपाला आलेला दिसत आहे.

