(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर पोलीस लाईन परिसरात बिबट्या व त्याचे दोन बछडे फिरताना आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे सुमारे ५ वाजता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
स्थानिक रहिवासी रऊफ खान यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या व बछडे पोलीस वसाहतीतून बाहेर येताना स्पष्ट दिसले. या घटनेमुळे पोलीस वसाहत आणि आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रामपेठ भागातील दोन पडकी घरे येथे देखील बिबट्याचा संचार होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वनविभाग व पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

