(संगमेश्वर / मकरंद सुर्वे
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख-संगमेश्वर हायवेवरील मयूर बाग परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे सुमारे ३ वाजता घडली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बिबट्या एका बांधावरून उडी मारत हायवेवर आला आणि काही वेळ फिरल्यानंतर रस्त्यालगतच्या झुडपामध्ये बसलेला दिसून आला. अचानक समोर आलेल्या या प्रकारामुळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक घाबरले आहेत.
दरम्यान, मयूर बाग व आसपासच्या वाड्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. स्थानिकांनी वनविभागाला तातडीने याची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी योग्य नियंत्रण मिळवता येईल.

