(खेड / प्रतिनिधी)
सौ. दिप्ती दिलीप यादव (एम.ए., एम.एड.) या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, माणी नं.१ येथे पदवीधर शिक्षिका आहेत. २३ वर्षांच्या सेवेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सृजनात्मक विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांनी दरवर्षी शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबवत, आदिवासी व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मदत केली, तसेच बाह्य परीक्षांसाठी मार्गदर्शन केले. सौ. दिप्ती यांनी विद्यार्थ्यांना काव्यलेखन, चारोळी, गझल व अभंग लेखन शिकवले, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या लेखनाचे प्रकाशन आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सौ. दिप्ती यांचे साहित्यिक योगदानही विशेष आहे; त्यांनी ५०० पेक्षा जास्त कविता आणि चारोळी, तसेच गझल व अभंग लेखन केले आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, शिक्षकरत्न पुरस्कार, बेस्ट टीचर अवॉर्ड, संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न पुरस्कार यांसारखे अनेक सन्मान मिळवले आहेत.
सौ. दिप्ती यादव हे शिक्षण, साहित्य आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. त्या त्यांच्या विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाहीत, तर त्यांना आत्मविश्वास, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव देखील देतात. सौ. दिप्ती यांनी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली आहे. तसेच, मराठी साहित्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे; त्यांनी कविता, गझल, अभंग आणि चारोळी लेखनाद्वारे अनेक वाचकांचे मन जिंकले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांना साहित्य आणि शिक्षणात मार्गदर्शन मिळाले असून, त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. सौ. दिप्ती यादव हे केवळ शिक्षक नाहीत, तर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचे आणि समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व ठरल्या आहेत. आमच्या प्रतिनिधीने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा…
नाव – सौ.दिप्ती दिलीप यादव
पदवीधर शिक्षिका
शाळा – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माणी नं.१
ता.खेड जि.रत्नागिरी
शैक्षणिक पात्रता – एम.ए.
व्यवसायिक पात्रता – एम.एड.
जन्मतारीख – १०/१/१९७६
अनोसुता – २१/०१/२००२
सेवा कालावधी – २३ वर्षे
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय केलेली कामे
१)दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 20 हजार रूपयांचा शैक्षणिक उठाव केलेला आहे.
२) आदिवासी समाजातील मुलांसाठी आर्थिक मदत केली जाते.
३) बाह्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बसवून जादा वेळ देऊन मार्गदर्शन केले जाते.
४) कौशल्याधिष्ठित उपक्रमांतर्गत इतर शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि कार्यानुभव अंतर्गत कागदी वस्तू शिकवणे.
उदाहरणार्थ- कागदी तिरंगी बॅजेस, कागदी बुके,कागदी फुले,कागदी,कापडी पिशव्या, विणकाम,रंगकाम इत्यादी.
छंद
१) टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे.
२) विणकाम करणे.
३) शिवणकाम करणे.
४) वृत्तबद्ध काव्यलेखन करणे.
५) गझल लेखन करणे.
६) अभंग लेखन करणे.
७) वाचन,लेखन करणे.
लेखनातून विद्यार्थ्यांना मिळालेली प्रेरणा
१) काव्यलेखनास 9 ऑगस्ट 2020 रोजी सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत 6 विद्यार्थी काव्यलेखन करीत आहेत. वाडीबीड शाळेतील दोन विद्यार्थीनींच्या कविता माय मराठी या पुस्तकात प्रकाशित झाल्या आहेत.
२) माणी नं.१ या शाळेतील एका विद्यार्थ्यांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिलेल्या कवितेला काव्य निनाद साहित्य मंच पुणे या संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मिळाला आहे.
साहित्य लेखन
आतापर्यंत ५०० च्या वर कविता लेखन झाले आहे. त्याचबरोबर ५०० पेक्षा जास्त चारोळी लेखन केलेले आहे. गझल लेखन आणि अभंग लेखन केलेले आहे. अनेक कविता,अभंग व स्वलिखित लेख दिवाळी अंकातून व वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आहेत.
पदे
- सन २००२ ते २००५ शिक्षण सेवक
- सन २००५ ते २०१४ उपशिक्षक
- सन २०१४ ते २०२९१८ पदवीधर
- २०१९ ते २०२३ पदवीधर तथा मुख्याध्यापक
- २०२३ ते आतापर्यंत पदवीधर शिक्षक
आतापर्यंतच्या शाळा व शाळेतील कार्य
शाळा – देवघर विद्यामंदिर
कालावधी – 21 जानेवारी 2002 ते 12 जून 2006
1)आदिवासी विद्यार्थ्यांचे स्वतः केस कापून आंघोळ घालण्याचे काम केलेले आहे.
2)दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचा 100% निकाल. यामध्ये भरत बाबू निकम हा आदिवासी विद्यार्थी उत्तीर्ण झालेला.
शाळा – मोहाने ऐनवली
कालावधी – 13 जून 2006 ते 3मे 2011
1)शाळेसाठी इंपोसिस कंपनी, पुणे यांच्याकडून तीन संगणक मिळवून दिले.
2) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100%
3) कु.यश प्रविण मोरे याचा रांगोळी स्पर्धेत बीटस्तरावर प्रथम क्रमांक
शाळा – कुडोशी
कालावधी – 4 मे 2011 ते 27 जून 2011
शाळेसाठी इंपोसिस कंपनी, पुणे यांच्याकडून तीन संगणक मिळवून दिले.
शाळा- खेड क्र.2
कालावधी – 27 जून 211 ते 27 ऑगस्ट 2014
1) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100%
2) 100% पट टिकवण्यासाठी प्रयत्न केले.इयत्ता तिसरीचा 31 पट सहावीपर्यंत टिकवून ठेवलेला.
3) शाळेसाठी इंपोसिस कंपनी, पुणे यांच्याकडून चार संगणक मिळवून दिले.
शाळा – वाडीबीड
कालावधी – 28 ऑगस्ट 2014 ते 16 मे 2023
पद
1)पदवीधर – 28ऑगस्ट 2014 ते 31 डिसेंबर 2018
2) मुख्याध्यापक – 1जानेवारी 2019 ते 16 मे 2023
1) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100%
2) सावित्रीबाई फुले दत्तक पालक एक केस केली.
3) आदिवासी समाजातील एक विद्यार्थिनीची नवोदयसाठी निवड..तिला आर्थिक मदत
4) नासा इस्रो परीक्षेत बीटस्तरापर्यंत तीन विद्यार्थी, तालुकास्तरावरापर्यंत दोन विद्यार्थी
4)हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धेत तालुकास्तरावरापर्यंत विद्यार्थी
5) बाह्य परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना जादा वेळ देऊन मार्गदर्शन
7) बाह्य परीक्षेत विद्यार्थी केंद्रात प्रथम
8) रत्नागिरी टॅलेंट सर्च परीक्षेत सातवीची विद्यार्थीनी बीटस्तरावर द्वितीय
9) 25,000 रूपयाचा शैक्षणिक उठाव
10) सहशालेय विविध उपक्रम राबविण्यात आले.
11) हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत कागदी बॅजेस मुलांना तयार करून दाखवण्यात आले त्याची दखल शिक्षणाधिकारी यांनी घेऊन शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यामार्फत अभिनंदन केले.
12) वयाची 107 वर्षे पूर्ण झालेल्या आजोबांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळेस त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.5000 हजार रूपयांचा शैक्षणिक उठाव करण्यात आला.
शाळा – माणी नं.१ (खेड)
कालावधी – 17 मे 2023 पासून
1) 15 जून 2023 ला देवघर विद्यामंदिर शाळेतील माजी विद्यार्थी श्री.रुपेश मोरे यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना 15 हजार रूपयांचे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले.
2) सन 2024 मध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सीटी यांच्याकडून शैक्षणिक व क्रीडा साहित्य मिळवून दिले.
3) सन 2024 मध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सीटी यांच्याकडून शैक्षणिक साहित्य मिळवून दिले.
4) नवभारत साक्षरता अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धेत स्वरा राजेंद्र सागवेकर हिचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक.
कामगिरी शाळा
1)शाळा वरवली – जुलै 2018 ते डिसेंबर 2018
2) शाळा सुकिवली – 11जुलै 2023 ते 5 ऑक्टोबर 2023
3) शाळा सवेणी नं.1 – 6 ऑक्टोबर 2023 ते 30 एप्रिल 2024
4) शाळा वेरळ नं.1- 15 जुलै 2025 पासून
कामगिरी शाळेत देखील विद्यार्थी चारोळी लेखन,काव्यलेखन करायला शिकले आहेत. कामगिरी शाळेतील मुलांचे मिळालेले प्रेम माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
साहित्य क्षेत्रातील योगदान
१) काव्य प्रेमी शिक्षक मंच रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्यकारिणीत काव्यलेखन उपक्रम प्रमुख म्हणून काम पाहते
२) काव्यलेखनाच्या स्पर्धांचे परीक्षण करणे.
पुरस्कार:
काव्यलेखनातून मिळालेले पुरस्कार
1) मित्रा तुझ्याचसाठी या कवितेला राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार
ठिकाण- जुन्नर, पुणे
दि.6 जानेवारी2022
2) कोरोना काळातील कळलेला माणूस या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल राज्यस्तरीय पत्रभूषण पुरस्कार..
ठिकाण- संगमेश्वर
दि.30 जानेवारी 2022
काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाकडून
1) साहित्य गौरव पुरस्कार
2) साहित्य भूषण पुरस्कार
3) चारोळी सम्राज्ञी पुरस्कार – 102 चारोळीचे लेखन
4) शिक्षक साहित्यरत्न पुरस्कार
5)प्रतिभावंत साहित्यिक पुरस्कार
6) शारदीय शक्ती स्वरूपा विशेष गौरव पुरस्कार
7) दीपोत्सव पुरस्कार
8) छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय विशेष काव्य पुरस्कार
9) साहित्य स्नेही पुरस्कार
10) गणेश वत्सल पुरस्कार
12) श्रीगणेश अक्षररत्न राज्यस्तरीय पुरस्कार 2025
“माझी लेखणी” साहित्य मंच शहापूर समूहाकडून
1) लेखणी सम्राज्ञी पुरस्कार
2) लेखणी रत्न साहित्य पुरस्कार 3 सप्टेंबर 2024
3) साहित्य प्रेमी साहित्य गौरव पुरस्कार 7 सप्टेंबर 2024
1) चिमणी दिनानिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त
दि.20 मार्च 2023
रोख रक्कम 701 रूपये प्राप्त
1) जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय लेख लेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त
लेख – महिलांचा आत्मसन्मान
रोख रक्कम 500 रूपये प्राप्त
दि.8 मार्च 2023
स्पर्धेतील काव्यलेखन
1)सन 2020 मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून भारत सरकारला काव्यातून निवेदन देण्यात आले होते.त्या काव्यलेखन स्पर्धेत 688 स्पर्धकातून उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला होता.
2) राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट,प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ असे क्रमांक प्राप्त झालेले आहेत.
शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल मिळालेले पुरस्कार
1) काव्यांगण लेखणीचे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार
दि.5 सप्टेंबर 2021
2) तेजभूषण फाऊंडेशनमार्फत राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार ठिकाण- आळंदी,पुणे
दि.26 डिसेंबर 2021
3) आविष्कार फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय बेस्ट टिचर अवॉर्ड
ठिकाण- पनवेल
दि.17 ऑक्टोबर 2021
4) रत्नसिंधू कलामंच संस्थेकडून राज्यस्तरीय नारी शक्ती पुरस्कार
ठिकाण- रत्नागिरी
दि.15 जानेवारी 2022
5) जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार
ठिकाण- नागमठाण, ता.वैजापूर जि.औरंगाबाद
दि.1 नोव्हेंबर 2022
6) विश्व समता कलामंच लोवले संगमेश्वर राज्यस्तरीय विश्व समता काव्य गौरव पुरस्कार 2022
7) आविष्कार फाउंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले राष्ट्रीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार
ठिकाण- गणपतीपुळे
दि.8 जानेवारी 2023
8) दैनिक ठाणे जीवनदीप वार्ता यांच्याकडून राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार
ठिकाण- गोवेली,कल्याण
दि.12 फेब्रुवारी 2023
9) काव्य निनाद साहित्य मंच पुणे या समूहाकडून संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न पुरस्कार 2025
ठिकाण – देवाची आळंदी,पुणे
दि.13 फेब्रुवारी 2025
10) 500 उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल साहित्यरत्न पुरस्कार
ठिकाण – देवाची आळंदी,पुणे
दि.13 फेब्रुवारी 2025

