(खेड)
खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवकांचा दैवज्ञ समाज विठ्ठल रखुमाई देवस्थान मंडळ, खेड तसेच सोनार आळी मित्र मंडळ व महिला मंडळ, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सौ. विजयालक्ष्मी मुरलीधर पेंडुरकर सभागृह, सोनार आळी, खेड येथे आयोजित करण्यात आला होता.
या वेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. माधवी ताई राजेश बुटाला यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेविका सौ. वैभवी (हेमा वहिनी) वैभव खेडेकर, श्री. स्वप्निल पांडुरंग सैतवडेकर आणि सौ. स्वप्नाली राकेश चव्हाण यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, श्री गणरायाची मूर्ती व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
सत्कार समारंभास दैवज्ञ समाज विठ्ठल रखुमाई देवस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय दांडेकर, चंद्रविलास कारेकर, सोनार आळी मित्र मंडळाचे उपाध्यक्ष उदय ऊर्फ पप्पू गुहागरकर, श्री. राजेश सुधाकर बुटाला, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मनीषा प्रसाद बुटाला, सचिव श्री. स्वप्निल वनारे, सहखजिनदार सरूप दांडेकर यांच्यासह समाजातील व मंडळातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये सौ. नेहा अजित दांडेकर, सौ. मिनल शेखर गुहागरकर, श्री. उदय दांडेकर, श्री. वसंत पिंपळकर, सौ. स्मिता घननीळ गुहागरकर, श्री. अजित दांडेकर, श्री. मनोज पावसकर, सौ. मनाली मनोज पावसकर, श्री. संजय शशिकांत दांडेकर, श्री. घननीळ गुहागरकर, सौ. संपदा गुजराथी, श्री. मयूर दांडेकर, सौ. अंजली पिंपळकर, सौ. साक्षी स्वप्निल सैतवडेकर, श्री. नंदकिशोर गुजराथी, सौ. लतिका मयूर दांडेकर, श्री. रितेश डंबे, सौ. सुमेधा समीर दांडेकर, सौ. शिवानी संजय दांडेकर, श्री. संतोष पटेल, भूषण कारेकर, जयेश गुहागरकर, श्री. प्रताप दांडेकर, श्री. राकेश चव्हाण, आशिष वडके, शेखर दांडेकर, राहुल दांडेकर, श्री. दिलीप कारेकर, श्री. अमोल गुहागरकर, अंकुश मिर्लेकर, प्रतीक पुळेकर आदींसह दैवज्ञ समाज विठ्ठल रखुमाई देवस्थान मंडळ, महिला मंडळ तसेच सोनार आळी मित्र मंडळ व महिला मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्यातून लोकप्रतिनिधींनी समाजहितासाठी आणि खेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला, तर उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

