(हैदराबाद)
व्यवसाय परिवर्तनासाठी एआय प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्विसनाऊ (NYSE: NOW) ने गुरुवारी ‘सर्विसनाऊ युनिव्हर्सिटी’ लाँच केली. एआय-संचालित जगात निर्माण झालेल्या कौशल्य तफावतीला कमी करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्लॅटफॉर्म डिझाइन करण्यात आला आहे.
हैदराबाद येथे झालेल्या सर्विसनाऊ एआय स्किल्स समिटमध्ये 1,200 विद्यार्थी प्रत्यक्ष आणि 20,000 पेक्षा अधिक विद्यार्थी व्हर्च्युअली सहभागी झाले. या कार्यक्रमात एआयसीटीई, शिक्षण मंत्रालय आणि नॅस्कॉमसह विविध भागीदारांनी सहभाग घेतला. कंपनीने 2027 पर्यंत भारतातील 1 दशलक्ष विद्यार्थी अपस्किल करण्याचा आणि जागतिक स्तरावर ही संख्या 3 दशलक्षांपर्यंत नेण्याचा दृष्टिकोन जाहीर केला.
टॅलेंट विकासासाठी मोठी गुंतवणूक
सध्या सर्विसनाऊकडे 3.18 लाख सक्रिय विद्यार्थी आणि 1.16 लाख प्रमाणित व्यावसायिक आहेत. कंपनीकडून विविध प्रोग्रॅम्सद्वारे विद्यार्थ्यांना रोजगारासाठी सक्षम करण्यात येत आहे. सर्विसनाऊ इंडिया टेक्नॉलॉजी अँड बिझनेस सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुमीत माथूर म्हणाले, “भारतामध्ये कंपन्या झपाट्याने एआय अवलंब करत आहेत, परंतु कुशल व्यावसायिकांची कमतरता आहे. आमच्या अभ्यासानुसार, भारतातील 26% कंपन्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांबाबत अनिश्चित आहेत. सर्विसनाऊ युनिव्हर्सिटी ही अनिश्चितता दूर करून विद्यार्थ्यांना एआय, समस्या-निवारण आणि नाविन्यपूर्ण क्षमतांनी सक्षम करेल. आमचं ध्येय म्हणजे 1 दशलक्ष एआय-तयार व्यावसायिक तयार करणं.”
एआयमुळे रोजगारात मोठा बदल
2025 सर्विसनाऊ एआय स्किल्स रिसर्चनुसार, एजेंटिक एआय 2030 पर्यंत भारतातील 10.35 दशलक्ष रोजगारांना नव्याने आकार देणार आहे. पुढील पाच वर्षांत 3 दशलक्ष नवीन टेक कर्मचाऱ्यांची भर पडेल. उत्पादन, रिटेल आणि शिक्षण क्षेत्रात एआय-डिझाइन-डेटा संयोजनाच्या भूमिकांना अधिक मागणी आहे. भारत सरकारच्या नॅशनल स्किल गॅप स्टडीनुसार, सध्या देशात 2-2.25 लाख डेटा इंजिनिअर्स आणि 40-50 हजार डेटा सिक्युरिटी व्यावसायिकांची टंचाई आहे.
सर्विसनाऊ युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना डिजिटल क्रेडेंशिअल्स, वैयक्तिकृत एआय-आधारित शिक्षण (‘युनिव्हर्सिटी ऑफ यू’), लघु अभ्यासक्रम, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा इंजिनिअरिंग अशा मोफत कोर्सेस उपलब्ध करून देणार आहे. कंपनी भारतातील तरुणांना एआय कौशल्य, गेमिफाइड शिक्षण आणि स्थिर करिअर मार्ग देण्याच्या उद्देशाने पुढे सरसावत आहे. ही युनिव्हर्सिटी आता सर्व विद्यार्थी, कर्मचारी, ग्राहक आणि भागीदारांसाठी उपलब्ध आहे.

