(रत्नागिरी)
निवळी-जयगड मार्गावरील करबुडे येथे बुधवारी (दि. २४) दुपारी साडेतीनच्या सुमारास कार आणि डंपरची जोरदार धडक झाली, ज्यात कार चक्काचूर झाली आणि चालक जखमी झाला.
जखमी अनिरुद्ध चव्हाण (रा. नाचणे) यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
उपलब्ध माहितीप्रमाणे, चव्हाण निवळीहून जयगडकडे जात होते, तर जयगडहून निवळीच्या दिशेने जाणारा डंपर त्यांच्या कारशी धडकला. या जोरदार धडकेत चव्हाण यांची कार रस्त्याच्या बाजूला जाऊन अपघातग्रस्त झाली आणि ती चक्काचूर झाली.
अपघातानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी चालकाला रुग्णालयात हलवण्यात आले.

