(मुंबई)
महागणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य उत्सवअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या, ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चा निकाल जाहीर झाला असून सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील ‘तिरंगा गणेशोत्सव मंडळा’ने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर लातूर येथील ‘वसुंधरा वृक्षारोपी गणेशोत्सव मंडळा’ने द्वितीय, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील ‘सुवर्णयोग तरुण मंडळा’ने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
यासोबतच जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांची घोषणा करण्यात आली असून तालुकास्तरापर्यंत विस्तारित केलेल्या या स्पर्धेअंतर्गत विजेत्या तालुकास्तरीय मंडळांची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आज (गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५) रोजी सकाळी ११ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून या समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्या मंडळांचा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी अभिनंदन केले आहे.
शासन निर्णय : राज्य-उत्कृष्ट-सार्वजनिक-गणेशोत्सव-मंडळ-स्पर्धेचा-निकाल

