(कुडाळ)
कुडाळ येथील झाराप, झीरो पॉईंट येथे पर्यटकाला मारहाण करणाऱ्या संशयितांची चहाची टपरी आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने हटवली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचातीने स्वतःहून टपरी हटवली आहे.
कुडाळ येथे महामार्गालगत असलेल्या हॉटेलमधील मालकासह त्याच्या कुटुंबीयांनी पर्यटकाला क्षुल्लक कारणावरून दोरीने बांधून मारहाण केली. या अमानुष मारहाणीबाबत समाजात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, याबाबत आमदार निलेश राणे सुद्धा या प्रकरणात आक्रमक झाले. त्यांनी पर्यटकांना मारहाण करणाऱ्यांची अनधिकृत टपरी येत्या २४ तासांत काढा; अन्यथा १२ फेब्रुवारी रोजी टपरी मी स्वतः येऊन हटवेन, असा इशारा प्रशासनाला दिला होता. कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याला जबाबदार पोलीस यंत्रणा राहील, असा इशारा राणे यांनी दिला होता. त्यानंतर पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतने टपरी हटवण्यात आली.