(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील पावटा मैदानावर लायन्स क्लब संगमेश्वरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य लायन्स महोत्सव फन फेअरचे उद्घाटन आज गुरुवार, १६ जानेवारी रोजी रात्री मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे १५ जानेवारीऐवजी आज उद्घाटन होत असून नागरिकांमध्ये या महोत्सवाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या रंगतदार महोत्सवाचे उद्घाटन ला. डॉ. कृष्णकांत पाटील (झोन चेअरमन, झोन २) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी राजाराम चव्हाण (पोलीस निरीक्षक, संगमेश्वर), ला. MJF उदय लोध (क्लब संस्थापक व माजी गव्हर्नर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
लायन्स क्लब संगमेश्वरचे अध्यक्ष ला. श्री. रविकांत शिंदे तसेच महोत्सव अध्यक्ष ला. श्री. विवेक शेरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा महोत्सव १६ ते २२ जानेवारी दरम्यान रंगणार असून संपूर्ण तालुक्यासाठी हा एक मोठा आनंदोत्सव ठरणार आहे.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करमणूक असणार आहे.
यामध्ये आकाश पाळणा, ब्रेक डान्स, टोरा-टोरा, मिकी माऊस, ट्रेन राईड यांसारखी आकर्षक खेळणी सज्ज आहेत.
खाद्यप्रेमींसाठी पर्वणी – चाट, दाबेली, मोमोज, शोरमा, भाकरी-मटण, चायनीज पदार्थांसह विविध चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.यासोबतच गृहोपयोगी वस्तू, खेळणी व कपड्यांचे स्टॉल नागरिकांचे विशेष आकर्षण ठरणार आहेत.
दररोज सांस्कृतिक मेजवानी
१७ जानेवारी – बॉलिवूड ग्रुप डान्स
१८ जानेवारी – ज्युनियर अमिताभ व ज्युनियर गोविंदा
१९ जानेवारी – देवरुख कला अकादमी समूह नृत्य कार्यक्रम
२० जानेवारी – हौशी कलाकारांचे गोळवली नमन
२१ जानेवारी – कला अकादमी नृत्य कार्यक्रम
२२ जानेवारी – मुंबई फेम भव्य ऑर्केस्ट्रा.
खास लोकाग्रहास्तव आज सर्व जनतेसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. संगमेश्वर व परिसरातील नागरिकांनी आजच्या उद्घाटनासह या लायन्स महोत्सवाला आवर्जून भेट देऊन खरेदी, खानपान आणि करमणुकीचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष ला. रविकांत शिंदे व महोत्सव अध्यक्ष ला. विवेक शेरे यांनी केले आहे.
आज रात्री आठ वाजता, संगमेश्वर लायन्स महोत्सव उदघाटन दिवशी जनतेसाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे

