(दापोली)
दापोली तालुक्यातील तेरेवांगणी गावात आज (२४ सप्टेंबर ) सकाळीं भटक्या कुत्र्याने हल्ला करून 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक गजानन पांडुरंग जाधव यांना चावा घेतल्याची घटना घडली.
सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास जाधव हे गावातील स्थानिक दुकानाकडे जात असताना एका भटक्या कुत्र्याने अचानक त्यांच्यावर झडप घालून चावा घेतला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या भटक्या कुत्र्यांमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून गावातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली आहे.

