(ठाणे)
ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आठपैकी सात आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या सात जणांना कल्याणच्या पोस्को विशेष न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
काय आहे घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्याच एका नातेवाईकाने सोशल मीडियावर “बॉयफ्रेंड देतो” अशी पोस्ट करून तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ओळखीच्या बहाण्याने तिची एका आरोपीशी भेट घडवून देण्यात आली. पुढे या आरोपींसह त्याच्या मित्रांनी पीडितेला वेगवेगळ्या वेळी बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. दरम्यान, या नराधम आरोपींनी अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत संबंध प्रस्थापित करून तिचा अश्लिल व्हीडीओही तयार केला होता.
त्यानंतर, हा व्हीडीओ त्यांनी आपल्या आणखी मित्रांना पाठवला. तसेच, हा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ७ तरुणांनी त्या अल्पवयीन विद्यार्थींनीवर जवळपास ५ महिने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडकीस आली. सदर प्रकार उघडकीस आला तेव्हा विद्यार्थिनी गरोदर राहिली होती. या नराधमांनी तिचा अश्लील व्हीडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्याने एकूण ७ नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पोलिसांनी सामूहिक बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, कल्याण न्यायालयाने सातही जणांना ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन विद्यार्थींनीवर अत्याचार करणारे हे नराधम धनाढ्य कुटुंबातील असल्याची माहिती आहे.
या मुलीसोबत एप्रिल महिन्यात राहुल भोईर नावाच्या तरुणाने इंस्टाग्रामवर मैत्री केली. या मैत्रीतून त्याने ‘बॉयफ्रेंड देतो’ सांगून प्रेमाचे नाटक करत तिला जाळ्यात अडकवले. त्यानंतर, त्याने या मुलीवर लैगिंक अत्याचार केला, त्याचा व्हीडीओही तयार केला. तो व्हीडीओ राहुलने दुसरा तरुण देवा पाटील याला पाठविला. देवा पाटीलने त्या मुलीस व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. देवा पाटीलनंतर अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे आणि किरण सुरवसे यांना हा व्हीडीओ पाठविण्यात आला. त्यानंतर, पुन्हा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत या सर्वांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना समोर आली.
याबाबत वकिलांनी सांगितले की, काही महिन्यापूर्वी नातेवाईकाने पीडितेला सोशल मीडियावर चाट करत तुला ‘बॉयफ्रेंड आहे का? अशी विचारणा केली होती. त्यावेळी पीडितेनं नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर तुला ‘बॉयफ्रेंड देतो’ असं सांगून दुसऱ्या नराधमाशी ओळख करून दिली होती. पीडितेला त्याच बहाण्याने बोलवून तिच्यावर वेळोवेळी ८ आरोपींनी बलात्कार केला.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे हे सगळे आरोपी मुरबाड आणि भिवंडी परिसरात राहणारे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास आणि न्यायालयीन निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

