(रत्नागिरी)
जिल्ह्यातील तब्बल १६ हजार १८५ रेशनकार्डधारकांचे धान्य वितरण बंद करण्यात आले आहे. सलग सहा महिने रेशनवर धान्याची उचल न केल्यास शिधापत्रिका आपोआप निष्क्रिय होतात. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
यामध्ये १४,०३६ प्राधान्य गटातील तर २,१४९ अंत्योदय गटातील शिधापत्रिकांचा समावेश आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
- मंडणगड : ७९४
- दापोली : १,६९४
- खेड : १,८२०
- गुहागर : १,०४९
- चिपळूण : ३,२३७
- संगमेश्वर : १,९२९
- रत्नागिरी : २,७९२
- लांजा : १,२०९
- राजापूर : १,६६१
दरम्यान, जिल्ह्यातील तब्बल २,७८,३७६ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास रेशनवर मिळणारा धान्याचा लाभ थांबण्याची शक्यता आहे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २,८२,२७३ शिधापत्रिका असून, त्यावर ११,३१,२५६ लाभार्थी नोंदणीकृत आहेत.

