(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सामाजिक बांधिलकी जपत मौजे साठरे बांबर बौद्ध विकास मंडळ (रजि.) व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा गावशाखा साठरे बांबऱ यांच्या संयुक्त विद्यमाने कपिलवस्तू बुद्धविहार च्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर शनिवार, दि. १७ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत कपिलवस्तू बुद्धविहार, साठरे बांबऱ येथे पार पडणार आहे. रक्तदात्यांना डोनर कार्ड, प्रमाणपत्र आणि रक्तगट तपासणी सुविधा मोफत पुरवली जाणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवला जात असल्याने हा उपक्रम केवळ रक्तदान नव्हे, तर मानवतेचा अनोखा उत्सव ठरणार आहे.
“चला आपण सर्व मिळून रक्तदान करूया, सामाजिक कार्याला हातभार लावूया” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली आयोजित या शिबिरासाठी चंद्रमणी सावंत (7875311875), राहुल सावंत (9145680395), रोहन सावंत (9284483227), संजु सावंत (9867056328) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.