(संगमेश्वर)
कोकण रेल्वेतील कडवई स्थानकाचे स्टेशन मास्टर समीर निर्मळ यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
समीर निर्मळ सकाळी ड्युटीवर जात असताना अचानक छातीत वेदना जाणवू लागल्या. तातडीने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या अकस्मात जाण्याने कोकण रेल्वे परिवार, सहकारी तसेच मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे.

