( तरवळ / अमित जाधव )
सन्मान नारीशक्तीचा या मथळ्याखाली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र (विभाग रत्नागिरी) यांच्या वतीने जाकादेवी खालगाव जिल्हा परिषद गटातील करबुडे गावात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे सोमवार दिनांक १५ डिसेंबर २०२५ या दिवशी आयोजन करण्यात आला होता.
सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे. या महिन्यात अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.विशेष करून महिलांसाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने हा पारंपरिक समारंभ आयोजित केला गेला होता.पारंपरिक पद्धतीने महिलांचे हळदीकुंकू समारंभ पार पडला, यावेळी महिलांनी एकमेकींना वाण वाटप केले. या नंतर खास करून महिलांसाठी मनोरंजक असा ‘खेळ पैठणीचा’ महिलांसाठी खास आयोजित करण्यात आला होता. ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात महिलांनी सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या या उपक्रमामुळे महिलांना आनंद मिळाला, तसेच त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. श्री. सचिन गोताड यांच्या नेतृत्वाखालील संस्थेचे कार्य महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
कार्यक्रमाला करबुडे गावच्या प्रथम नागरीक सरपंच संस्कृती पाचकुडे, करिष्मा गोताड उप सरपंच करबुडे, हरीचंद्र वेदरे पोलीस पाटील करबुडे, अनुपम गोवळकर जिजाऊ सदस्य, समृद्धी साळवी, रुंजी शितप, दीपिका वेदरे उपस्थित होते. या सर्वांच अधिक सहकार्य लाभले तसेच शिक्षक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी जिजाऊ संस्थेचे खालगाव जाकादेवी विभागप्रमुख श्री. सचिन गोताड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ते नेहमीच महिलांसाठी विविध स्तुत्य उपक्रम राबवत असतात. या कार्यक्रमामुळे महिलांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि त्यांच्यामध्ये सामाजिक सलोखा वाढण्यास मदत झाली. परिसरातील १५० हून अधिक महिलांची उस्फुर्त लक्षणीय उपस्थिती होती.

