(कळझोंडी / किशोर पवार)
विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्धांनी अखंड मानव जातीच्या सुख आणि कल्याणासाठी अत्यंत लाभदायक आणि उत्कर्षकारक असे महामंगलसुत्त दिले आहे. या महामंगलसुत्ताचा अवलंब करून प्रत्येक मानव जातीने आपल्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी प्राप्त करावी,असे प्रतिपादन बौद्धाचार्य तथा पत्रकार वैभव पवार यांनी केले. रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे बौद्धवाडी येथील बुद्धविहारात आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास धार्मिक प्रबोधन कार्यक्रमात ते मुख्य प्रवचनकार म्हणून बोलत होते.
रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समिती व संस्कार समिती रत्नागिरी आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १४ मौजे कोतवडे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास या धार्मिक प्रबोधन कार्यक्रमात “महामंगलसुत्त” या विषयावर त्यांनी प्रवचन देताना मानवी जीवन ख-या अर्थाने सुखसमृद्धीचे जगण्यासाठी कुशल कर्म, प्रामाणिक लोकांची संगत व भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या सन्मार्गाने वाटचाल करून धम्माचा रथ पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी विविध उदाहरणे देऊन उपस्थित धम्म बंधू भगिनींना संबोधित करताना केले.
यावेळी धम्म पिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.सुनिल कांबळे, तालुका अध्यक्ष प्रकाश पवार, सेक्रेटरी सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे अध्यक्ष आयु संजय आयरे, सचिव रविकांत पवार, तालुका महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, उपाध्यक्षा रितिका जाधव, सेक्रेटरी दिया कांबळे, माजी अध्यक्षा-तृप्ती कांबळे,कोतवडे महिला मंडळाच्या अध्यक्षा कविता कांबळे , धार्मिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते विलास कांबळे, प्रितम आयरे, विवाह मंडळ अध्यक्ष सुनील कांबळे,कला क्रीडा समिती अध्यक्ष सौरभ आयरे, वृत्त प्रसिद्ध समितीचे अध्यक्ष किशोर पवार, आरोग्य समितीचे दिनकर कांबळे, कोतवडे बौद्धजन पंचायत समितीचे बाँडी बिल्डर स्पर्धेतील नामवंत राष्ट्रीय स्पर्धक सुहास मोहिते व बाँडी बिल्डर स्पर्धेतील नामवंत पंच म्हणून गौरव प्राप्त संजीवनी कांबळे यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रारंभी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कोतवडे बौद्धवाडी येथील बुद्धविहारात भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर धार्मिक पूजापाठ घेण्यात आला.या कार्यक्रमात कोतवडे गावशाखेचे सहसचिव निलेश कांबळे यांनी प्रास्ताविक स्वागत व सूत्रसंचालन केले. त्यानंतर संस्कार समितीचे सचिव रविकांत पवार गुरुजी यांनी तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या संस्कार समितीचे कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे विविध उपक्रमांची माहिती देताना बौद्धजन पंचायत समितीचे कामकाज व दप्तर तपासणी बाबत सखोल माहिती दिली. त्याचबरोबर आरोग्य सहाय्यता निधीतून मिळणारी मदत या बाबत ही माहिती दिली.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून कोतवडे गावचे सुपुत्र व बाँडी बिल्डर स्पर्धेतील विजेते सुहास मोहिते व बाँडी बिल्डर स्पर्धेतील पंच म्हणून संजीवनी कांबळे यांचा रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व तालुका महिला मंडळ व कोतवडे बौद्धजन पंचायत समिती व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुके व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रकाश पवार व महिला मंडळ अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर व पुरुष महिला कार्यकर्त्यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अतिशय उत्तम नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोतवडे शाखेचे अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष नरेश कांबळे, सेक्रेटरी दिनकर कांबळे, सहसचिव निलेश कांबळे, महिला मंडळाच्या अध्यक्षा कविता कांबळे, उपाध्यक्ष स्मिता कांबळे, सचिव दिया कांबळे, सांची कांबळे, खजिनदार समिक्षा कांबळे, शाखेचे हेमंत कांबळे, अरविंद कांबळे, अभिजित कांबळे, गोपीचंद कांबळे, प्रतिक कांबळे,अमय कांबळे,मयुर कांबळे, म़गेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
अध्यक्षीय भाषणात सुनील कांबळे कांबळे यांनी स्तुत्य उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले व सर्वांना धन्यवाद दिले.
शेवटी सर्वांचे आभार सहसचिव निलेश कांबळे यांनी मानले.शेवटी सरणत्तेय गाथा आणि स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

