(खेड)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बिजघर नंबर १ शाळेत विशेष ग्रामसभा उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच शुभांगी भोसले होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे शिक्षक शैलेश पराडकर यांनी स्वागत केले. ग्रामपंचायत अधिकारी रमेश निकम यांनी प्रास्ताविक केले. तिसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख व नोडल अधिकारी महेंद्र जाधव यांनी अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली. तर गावचे तलाठी सुशील भोसले यांनी ‘सेवा पंधरवडा’ या टप्पा एक, दोन आणि तीन याबाबत मार्गदर्शन केले.
विशेष ग्रामसभेला उपसरपंच सखाराम जाधव, पोलीस पाटील प्राची मर्चंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश विचारे, माजी अध्यक्ष विजय येरुणकर, माजी उपसरपंच रामकृष्ण भरणे, माजी सरपंच काशिनाथ शिगण यांच्यासह गावातील मान्यवर, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप संदीप घाणेकर यांनी आभार प्रदर्शनाने केला.

