(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात महिला विकास कक्षामार्फत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे रक्तगट, हिमोग्लोबिन, सीबीसी आदींची तपासणी करण्यात आली. यावेळी १०० हून अधिक कर्मचारी व विद्यार्थी यांची तपासणी झाली.
या तपासणी कार्यात ग्रामीण रुग्णालय रायपाटणचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जगदीश पाटील, प्रयोगशाळा सहाय्यक अमोल वाडेकर आदी कर्मचार्यांनी काम पाहिले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.एस मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.एस. एस.धोंगडे महिला विकास कक्षाच्या सर्व सदस्यांनी काम पाहिले.

