(संगमेश्वर /प्रतिनिधी)
आयुष्यमान आरोग्य मंदिर, तुरळ अंतर्गत डिकेवाडी येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी मोबाईल मेडिकल युनिट (MMU) पथकाद्वारे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांची बी.पी., शुगर व विविध आरोग्य तपासण्या करून आवश्यक ते उपचार करण्यात आले. तसेच अनेक लाभार्थ्यांची आयुष्यमान गोल्डन कार्ड नोंदणी करण्यात आली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. खाडे मॅडम, फार्मसिस्ट नरोटे मॅडम, पत्रकार रमेश डिके, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकांत डिके, CHO श्री. घुले, ANM सौ. भुवड, आशाताई पाचकले, मदतनीस सौ. जाधव व सौ. माधवी पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीपणे पार पडले असून ग्रामस्थांना आरोग्य तपासणी व योजनांचा लाभ घेण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे.

