(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील एस.एन. कानडे आयडियल हायस्कूल देवळे यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमाने संपन्न झाले.
देवळे हायस्कूलच्या मुलांनी विविध विषयांवर आपले नृत्यविष्कार सादर केले. यामध्ये शेतकरी गीत, धनगरी गीत, कोळीगीत, विशेष म्हणजे गौरी गणपतीतील नाच मुलींनी सादर केला. राधा आणि कृष्ण यांचे गीत फार सुंदर नृत्य अविष्कारनी सादर केलं. या गीताला वन्समोअर मिळाला.
या कार्यक्रमात शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा विज्ञान प्रदर्शन अशा स्पर्धातून नाविन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल व तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल या स्पर्धक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इस्रो भेटीसाठी अमेरिकेला जाऊन आलेल्या समीक्षा बोडेकर हिला संस्था अध्यक्ष निलेश कोळवणकर यांनी मे. सनराज ट्रेडिंग कंपनी कोल्हापूर यांच्याकडून रोख रुपये 10,000 मिळवून दिले तेही यावेळी समीक्षा बोडेकर हिला देण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ध्रुवी बागवे व मार्गदर्शक शिक्षक देसाई यांचाही सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमाच्या वेळी भाऊ कदम हे शिक्षकेतर कर्मचारी काही दिवसात सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष निलेश कोळवणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या काही खोल्यांच्या बांधकामाच्या वेळी काम करणाऱ्या राजा नवाले,वपांडुरंग भातडे, भाऊ गार्डी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश कोळवणकर, उपाध्यक्ष प्रबोध आठल्ये, सदस्य प्रकाश चाळके, भाऊ कानडे संतोष परशेटे, देवळे पोलीस पाटील विजीत साळवी, चाफवली पोलीस पाटील विजय चाळके, बंड्या परशेटे, मुख्याध्यापिका सुप्रिया गार्डी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक शरद गार्डी यांनी केले.

