(नवी दिल्ली)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. या विशेष प्रसंगी भारतीय जनता पक्ष (भाजप) देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ आयोजित करणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बंसल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सेवा पंधरवड्याचे उद्दिष्टे
भाजपने या उपक्रमाला केवळ एक कार्यक्रम न ठरवता जनतेला सेवा, स्वच्छता आणि विकासाशी जोडणारे जनआंदोलन असे स्वरूप दिले आहे. या पंधरवड्यात पुढील गोष्टींवर विशेष भर देण्यात येणार आहे:
- गरीब कल्याण योजना जनतेपर्यंत पोहोचवणे
- स्वच्छता आणि ओडीएफ प्लस मिशन पुढे नेणे
- ‘एक झाड आईच्या नावे’ सारखे पर्यावरणपूरक उपक्रम
- आत्मनिर्भर भारत संकल्पना बळकट करणे
- देशभरातील प्रमुख उपक्रम
- रक्तदान आणि आरोग्य शिबिरे
- प्रदर्शने : मोदींच्या सेवा आणि विकास कार्यांवर आधारित
- प्रबुद्ध समाज संमेलन व सत्कार समारंभ
- मोदी विकास मॅरेथॉन (21 सप्टेंबर)
- स्वस्थ नारी-सशक्त भारत अभियान : सुरुवात धार, मध्य प्रदेश येथून
- वृक्षारोपण मोहिम – ‘एक झाड आईच्या नावे’
- स्वच्छता अभियान आणि मिशन लाइफ
- विशेष कार्यक्रम : पं. दीनदयाल उपाध्याय आणि महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर)
व्यापक जनआंदोलनाचा संकल्प
सुनील बंसल यांनी सांगितले की, “हा सेवा पंधरवडा पंतप्रधान मोदींच्या जनसेवेच्या संकल्पनेला देशभरात प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आहे. प्रत्येक नागरिकाने स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि विकासासाठी योगदान द्यावे.” या पंधरवड्यासाठी राज्य, जिल्हा आणि ब्लॉक पातळीवर सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक ते केंद्रीय स्तरावरील सर्व नेते या उपक्रमात सहभागी होणार आहेत. भाजपने स्पष्ट केले की, सेवा आणि विकासाची कामे पक्ष-सरकारपुरती मर्यादित नसून, ती जनतेच्या सहभागाने पूर्ण होतील. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम देशभरात राबवला जाणार आहे.

