(रत्नागिरी)
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ऑगस्ट २०२५ मध्ये पडताळणी प्रक्रियेला गती देत एकूण ४९३ प्रकरणे निकाली काढली. यापैकी ४८८ प्रकरणे वैध ठरली, तर ५ प्रकरणे विविध कारणांमुळे निकाली काढण्यात आली.
जुलै २०२५ अखेरीस समितीकडे ३७६ प्रकरणे प्रलंबित होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ३६९ नवीन अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे एकूण ७४५ प्रकरणांपैकी ४९३ प्रकरणे निकाली निघाली असून २५२ प्रकरणे अजूनही प्रक्रियेत आहेत.
सद्यस्थितीत प्रलंबित असलेल्या २५२ प्रकरणांपैकी १६४ प्रकरणे एका महिन्यापेक्षा कमी कालावधीची आहेत, ७१ प्रकरणे ४५ दिवसांच्या आत, तर १७ प्रकरणे ४५ दिवसांपेक्षा जास्त आणि तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी प्रलंबित आहेत.
ही आकडेवारी समितीच्या कामकाजातील वेग आणि पारदर्शकता अधोरेखित करते. नागरिकांना अचूक व तातडीची सेवा देणे आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करणे हे समितीचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट होते.

