(खेड)
खेड तालुक्यातील परशुराम घाट येथील एअरटेल टॉवरवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी हात साफ केला आहे. टॉवरच्या वॉलकंपाउंडचे लोखंडी गेट व फायबर रूमचा लॉक फोडून तब्बल १.५ लाख रुपये किमतीची उपकरणे चोरट्यांनी लंपास केली आहेत.
फिर्यादी सुहास दत्ताराम चव्हाण (वय ४४, रा. गवाणे गवळीवाडी, ता. लांजा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.५४ वाजेपूर्वी ही घटना उघडकीस आली. परशुराम घाटाजवळील हॉटेल रिव्हर व्हिव्ह समोरील ओपन प्लॉटमधील एअरटेल टॉवर (इंडस आयडी १०५३४२३) येथून चोरट्यांनी Airtel Cisco Peyto SFP Cards 100cr ही दोन कार्ड्स चोरून नेली. या प्रकरणी गु.र.नं. २७८/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

