(संगमेश्वर / एजाज पटेल)
धम्मक्रांती कलामंच (रत्नागिरी) आयोजित संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थी आणि कलावंतांचा विशेष सन्मान दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी शुभगंधा मंगल कार्यालय मयुरबाग लोवले या ठिकाणी सकाळी ठीक १० वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आगळेपणा असा की याच ठिकाणी धम्मक्रांती समुहाच्या वतीने चार कलाविष्कारांचा शुभारंभ केला जाणार आहे. त्यात जलसा, गायन पार्टी, ऑर्केस्ट्रा, कराओके या चारही कलाविष्कारांचा समावेश आहे.
मुख्य म्हणजे आजवर या कलेची जोपासना करणाऱ्या हाडाच्या कलावंताना एकत्रित आणण्याचे कार्य धम्मक्रांती समुहाने केले आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित रसिक प्रेक्षक आणि सन्माननीय अतिथी महोदयांचे भारावून सोडेल असे स्वागत, प्राचिन कलाविष्कार, साहसी मर्दानी खेळ म्हणजे लाठीकाठी आणि ढोल ताशा वादनाने केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक, राजकीय व कलेसाठी आमुलाग्र योगदान दिलेले मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अन्य क्षेत्रातील खास व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. १४ सप्टेंबर २०२५ रोजी हा आगळा थरार अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना लाभणार आहे. आयोजकांच्या वतीने या कार्यक्रमाला जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आली आहे.

