(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
पोलिसांनी आपली गणपती सीझनची ड्युटी बजावून संगमेश्वर पोलीस ठाणे वसाहतीच्या गणपतीचे आपला स्वतःच्या गणपतीची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढत विसर्जन करण्यात आले. यावेळी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वसाहतीच्या गणपतीचे विसर्जन दरवर्षी इतर गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर केले जाते. अनेक पोलीस बंदोबस्ताला असल्याने त्यांना घरी जाणे शक्य होत नाही, त्यामुळे पोलीस ठाण्याच्या वसाहतीच्या गणपतीच्या मिरवणुकीसह इतर कार्यक्रमांमध्ये पोलीस उत्साहाने सहभाग नोंदवतात. यावर्षीही थाटामाटात विसर्जन करण्यात आले.

