(रत्नागिरी)
मनसेतून बडतर्फ केलेल्या काही नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांनी केले आहे.
जाधव म्हणाले, “जिल्ह्यातील ९५ टक्क्यांहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. यापुढील काळात मनसे रत्नागिरी जिल्ह्यात कात टाकून नव्या जोमाने उभारी घेईल. महाराष्ट्र सैनिक आपल्या निष्ठा व कर्तृत्वातून पक्षप्रेम सिद्ध करतील.” यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवताना, पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर विश्वास व्यक्त केला.

