(नाणीज)
काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निरागस नागरिकांवर झालेल्या अमानवी व क्रूर हल्ल्याचा दक्षिण पिठाचे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. जगद्गुरुश्री यांनी म्हटले आहे की, “संपूर्ण मानवतेच्या विरोधात हा हल्ला आहे. ही घटना केवळ व्यक्तीवर नाही, तर आपल्या संस्कृतीतील शांतता, सहिष्णुता, सहअस्तित्व आणि माणुसकीच्या मूल्यांवर केलेला आघात आहे.”
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी पुढे म्हटले की, “हिंदू धर्म हा करुणा, अहिंसा आणि बंधुभाव शिकवतो , पण जेव्हा दुष्ट प्रवृत्तींनी निष्पाप जनतेवर अशी हिंसा केली जाते, तेव्हा संपूर्ण समाजाने जागृत होणे गरजेचे असते. ह्या कृत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. शहीद कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. शासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी, हीच अपेक्षा.!”