(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज (मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी) सरपंच सौ. श्वेता खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेत विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. यावेळी मालगुंड गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय उपस्थित झाला.
गावचे माजी सरपंच आणि माजी सभापती प्रकाश साळवी यांनी माजी कृषी अधिकारी व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुंड शाखेचे सचिव विलास राणे यांचे नाव अध्यक्षपदी सुचवले. या प्रस्तावाला शिवसेनेचे शाखाप्रमुख अतुल पाटील यांनी अनुमोदन दिले. सुरुवातीला माजी उपसरपंच संतोष चौगुले यांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली होती; मात्र त्यांनी स्वखुशीने माघार घेत राणे यांना पाठिंबा दर्शवला. चौगुले यांनी “विलास राणे हे मनमिळावू व लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असून कृषी अधिकारी म्हणून त्यांनी पंचक्रोशीत उल्लेखनीय कार्य केले आहे” असे स्पष्ट करताच ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
यानंतर जिल्हा बँकेचे संचालक तसेच कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन (आबा) पाटील यांनी चौगुले यांच्या भूमिकेचे कौतुक करून नवनिर्वाचित अध्यक्ष विलास राणे यांचे अभिनंदन केले. सभेसाठी ग्रामस्थ, महिला व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर सभेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. प्रकाश साळवी, विधानसभा क्षेत्र प्रमुख गजानन उर्फ आबा पाटील ,तालुका संघटक रोहित मयेकर,उपतालुकापमुख राजू साळवी, माजी सभापती साधना साळवी, शाखाप्रमुख अतुल पाटील, तसेच मालगुंडचे प्रसिद्ध उद्योजक शेखर खेऊर, उदय साळवी, विकास साळवी, परेश हळदणकर, भूषण मयेकर त्याचप्रमाणे सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच स्मिता दुर्गवळी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रक्षाळे, लिपिक मिलिंद खेऊर, सदस्य सन्मान मयेकर, अमित पाटील, प्रीतम मयेकर, सौ. डांगे मॅडम, सौ. पवार,सौ. गोनबरे, संतोष चौगुले आदींसह अन्य सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक जयेंद्र खोत, सुहास पाटील, रामानंद लिमये, प्रकाश जाधव, दीपक दुर्गवळी, संजय दुर्गवळी, रोहित साळवी, जगन सुर्वे ,संजय खेऊर, बंटी साळवी, भैय्या साळवी, साईनाथ जाधव, सुशांत घाणेकर, बावा आग्रे,संतोष उर्फ बंडू साळवी, सायली साळवी, संदीप देसाई, योगेश साळवी, अनघा तोडणकर, पोलीसपाटील आस्था पाटील, निधी मांडवकर, अमोल राऊत, शशिकांत पवार यांचेसह विलास राणे यांची पत्नी विशाखा राणे, चिरंजीव ओंकार राणे, सौ. पूजा राणे यांच्यासह त्यांचा परिवार आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या परिवारातील अनेक मान्यवरांनी विलास राणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि मालगुंड गावचे रहिवासी व रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी यांनी दूरध्वनीवरून विलास राणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रामसभेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश साळवी, विधानसभा क्षेत्र प्रमुख गजानन पाटील, तालुका संघटक रोहित मयेकर, माजी सभापती साधना साळवी, सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक तसेच राणे यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
गावातील सर्वसामान्यांना अपेक्षित असणाऱ्या बाबींना प्राधान्य देऊन गावात शांतता व सौहार्दता जपण्यासाठी प्रयत्न करणार विलास राणे यांची ग्वाही
या निवडीप्रसंगी नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष विलास राणे यांनी सांगितले की, येत्या काळात गणपती उत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सण – उत्सवात गावामध्ये आनंदी वातावरण राहील आणि त्यासाठी योग्य तो संवाद साधून गावामध्ये शांतता आणि सौहार्दता कायम राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

