(रत्नागिरी / वार्ताहर)
युवासेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्या वतीने काळबादेवी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत कुमारी अनन्या अमित मयेकर, कुमारी आरोही सूचित मयेकर, कु. यश दिनेश बिर्जे आणि कुमारी शुभ्रा गणेश भोळे यांनी उल्लेखनीय यश मिळवले.
तर क्रीडा स्पर्धांमध्ये कु. अनुज अमोल शेट्ये (लांब उडी – तालुकास्तर), कु. यश दिनेश बिर्जे (बुद्धिबळ – तालुकास्तर), कुमारी अन्वी विनय मयेकर (लांब उडी – केंद्रस्तर) आणि कुमारी पूर्वी ऋषिकेश शेट्ये (धावणे – केंद्रस्तर) यांनी प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक संतोष भुवड तसेच सहाय्यक शिक्षिका वैशाली झोरे आणि अमृता काजवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यावेळी बोलताना युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत म्हणाले की, शाळेत खेळण्यासाठी मैदान नसतानाही विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. शाळेला खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिवसैनिक बंडयाशेठ पेटकर, शाळा कार्यकारिणी मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. सावली सूचित मयेकर, अंगणवाडी सेविका सौ. राखी भोळे, युवासेना समन्वयक साई गावडे, काळबादेवी शाखाप्रमुख ओंकार सत्यजित (सत्या) वायंगणकर, उपशाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे तसेच युवासेना स्थानिक प्रतिनिधी रणजितसिंग मालगुंडकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भुवड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

