(मुंबई)
केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 ची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील विविध राज्यांतील ४५ शिक्षकांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यामध्ये राज्यातील तिघांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील विजेत्यांमध्ये —
-
सोनिया विकास कपूर, ऍटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूल क्रमांक दोन, मुंबई
-
डॉ. शेख मोहम्मद वाकूउद्दीन शेख हमीदोद्दीन, जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर, नांदेड (मराठवाडा)
-
डॉ. संदिपान जगदाळे, दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर
यांचा समावेश आहे.
या पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, ५० हजार रुपयांचा रोख पुरस्कार आणि सिल्वर मेडल देण्यात येणार आहे. सर्व निवड झालेल्या शिक्षकांना ३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत दिल्लीत बोलावण्यात आले आहे. केंद्र सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदा महाराष्ट्रातील तिघांची निवड झाल्याने राज्यभरातून, विशेषतः मराठवाड्यातून, या शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

