(रत्नागिरी / वार्ताहर)
लांजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू अंतर्गत उपकेंद्र पुनस व ग्रामपंचायत पुनस यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच श्री. संतोष लिंगायत यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबूचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कामत व डॉ. शिवराज नवले उपस्थित होते. श्री. संतोष साळवी (प्रतिष्ठित नागरिक), ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रभोध कीर, सदस्य सौ. रश्मी सावंत, श्री. प्रमोद गुरव आदी मान्यवरही या प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य निरीक्षक श्री. दिलीप गुरव, आरोग्य सहाय्यक श्री. मंगेश पाटील, एक्स-रे तंत्रज्ञ श्री. निलेश हंगे, आरोग्य सहाय्यक श्री. शैलेश रेवाळे, आरोग्य सहाय्यिका सौ. स्नेहल झगडे यांचे विशेष योगदान राहिले. तसेच MPW सुधीर लिंगायत, शुभम कांबळे, सुरज सोळंके, ANM प्रिती कांबळे, सौ. क्षितिजा लोखंडे, सौ. प्रणाली गोरे यांनी रुग्णांची आधुनिक तपासणी केली. आशा कार्यकर्त्या, पोस्टमन व अंगणवाडी सेविका यांनीही परिश्रम घेतले.
या शिबिरात समता फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या सहकार्याने डॉ. उगवेकर व श्री. नितीश शेट्ये यांनी डोळ्यांची तपासणी केली व मोतीबिंदू तपासणी करून ग्रामस्थांना मोफत चष्म्यांचे वाटप केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू कार्यक्षेत्रातील हर्चे, आगवे, कोट, खानवली आदी ग्रामपंचायतींमध्ये यापूर्वी यशस्वी आरोग्य शिबिरे पार पडली असून उर्वरित ग्रामपंचायतींमध्येही लवकरच क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत शिबिरे घेण्यात येतील, असे आश्वासन आरोग्य निरीक्षक श्री. दिलीप गुरव यांनी यावेळी दिले.

