(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय करबुडे लाजुळ येथे सायबर जागरूकता मोहीम कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडली
गोगटे जोगळेकर महाविद्यालय च्या Cyber Warrior Club तर्फे, आणि Quick Heal Foundation च्या सहकार्याने “Cyber Shiksha for Cyber Suraksha” ही सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणारी मोहीम माध्यमिक विद्यालय करबुडे येथे राबवण्यात आली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती देणे, आणि त्यांना डिजिटल जागरूक नागरिक बनवणे हा होता. कार्यक्रमात OTP फसवणूक, गेमिंग फ्रॉड, सोशल मीडिया फसवणूक यासारख्या सायबर गुन्ह्यांवर आधारित माहितीपूर्ण सादरीकरण, संवाद सत्र आणि प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले.
कार्यक्रमात Cyber Warrior Club चे सदस्य रिद्धी जाधव, अथर्व सावंत यांनी सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सावधगिरीच्या उपायांची माहिती प्रभावीपणे दिली. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना रोजच्या डिजिटल व्यवहारात कोणती काळजी घ्यावी याचे समजून सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा शपथ घेतली आणि डिजिटल माध्यमात जबाबदारीने वागण्याची प्रतिज्ञा केली.
या प्रसंगी शिक्षक व प्रमुखांनी कार्यक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना सायबर जागरूकतेचे शिक्षण मिळणे ही आजच्या काळाची गरज आहे. ही मोहीम Quick Heal Foundation च्या सहकार्याने राबवण्यात आली असून, Cyber Surakshit Bharat घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे आयोजकांनी सांगितले.

