(साखरपा / भरत माने)
गणपती उत्सव आणि कोकण हे एक अनोखे नाते आहे आणि त्यामध्ये जाखडी नृत्य ही एक लोकप्रिय परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर भवानी कॅटर्स यांच्यावतीने 30 ऑगस्टला गौरी गणपती सणा निमित्त अनोख्या अशा ४० वर्षावरील जाखडी नृत्य स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. मागील अनेक वर्षे सावंत कुटुंबियांच्या वतीने जाखडी स्पर्धा ठेवण्यात येतात. यंदाही अगळ्या वेगळ्या अशा जाखडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी 7 वाजल्यापासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम विजेत्याला १५०००/-, द्वितीय विजेत्याला १३०००/-, तृतीय विजेत्याला ११०००/- रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.तसेच आकर्षक असे चषक देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट ढोलकी, वेशभूषा, नृत्य रंगबाजी, गायक अशी वैक्तिक बक्षिसे देण्यात आली आहेत. ही स्पर्धा कलगीतुरा समाज ऊन्नती मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे.
या स्पर्धेसाठी नामवंत मंडळे सहभागी होऊन स्पर्धेची शान वाढवणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दत्ताराम आत्माराम सावंत, बाळकृष्ण (गोट्या) सावंत व सावंत परिवार मेहनत घेत आहेत.या स्पर्धेला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सावंत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या रूपाने जाखडी लोककला शौकीनाना पर्वणी असणार आहे.

