(देवरूख / सुरेश सप्रे)
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांचा वाढदिवस विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी आंबव ग्रामदैवता श्री कालीश्री देवीचे रवींद्र माने यांनी दर्शन घेतले. त्यानंतर राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विशेष कार्यक्रम झाला. प्रथम प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या दैदिप्यमान कामगिरीचा त्यांनी आढावा घेत मागील सत्तावस वर्षातील यशस्वी वाटचालीची उपस्थिताना माहिती दिली. महाविद्यालयाने एन बी ए व नॅक सारखी सर्वोच्च दर्जाची मानांकने व काही महत्वाचे पुरस्कार प्राप्त करून मोठी प्रगती साधली आहे, असे ते यावेळी म्हणाले.
यानंतर संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने व अन्य सुहासिनिंनी भारतीय परंपरेनुसार रवींद्र माने यांचे औक्षण करून अभिष्टचिंतन केले. संस्थेचेवतीने प्राचार्य डॉ. महेश भागवत व सर्व विभागप्रमुखांनी माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना ६७ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनच्या प्राध्यापक, कर्मचारी, व ग्रामस्थ पालक व विद्यार्थ्यांकडून माने यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, सहसचिव दिलीप जाधव, विश्वस्त सौ. जान्हवी माने, सीईओ. प्रद्युम्न माने, सौ. ईशानी माने, कार्तिकेयन , उपप्राचार्य डॉ. अनिरुद्ध जोशी, राजेंद्र माने पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. नितीन भोपळे उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या उभारणी पासून मागील सत्तावीस वर्षातील आपले अनुभवकथन रविंद्र माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात करून आपले संस्कार व पिंड हा समाजकारणाचा असल्याने त्याच उद्देशाने आपण १९९८ साली हे महाविद्यालय उभे केले असे ते म्हणाले. आज या महाविद्यालयामुळे भोवतालची परिस्थिती बदलली असून इथला विद्यार्थी इंजिनिअर बनून समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावत आहे याचा विशेष आनंद व अभिमान आहे असे सांगितले.
महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, व विद्यार्थी यांचे मिळालेले प्रेम व विश्वासामुळे आपण महाविद्यालयचा दबदबा निर्माण केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
या दिवसाचे निमित्त साधून महाविद्यालयामध्ये एन एस एस विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. तसेच डेरवण येथील वालावलकर रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात बहुसंख्य विद्यार्थी व कर्मचा-यानी रक्तदान केले. रक्त संक्रमण अधिकारी डॉ. गुरुदेव स्वामी, टेक्निकल सुपरवायझर रवी कुमार यांचे यासाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमादरम्यान मेकॅनीकल विभागातील प्राध्यापक डॉ. अच्युत राउत यांना व्हायब्रेशन इंजिनीअरिंग या पुस्तकातील त्यांचा संशोधन पेपर प्रकाशित झाल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर राजेंद्र माने पॉलिटेक्निक. साडवली येथील कै. मिनाताई ठाकरे विद्यालय व इंदिरा फार्मसी काँलेज येथे वाढदिवस व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी फार्मसी काँलेज प्रा. अमोल खाडे. ठाकरे विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.बी. नलावडे, सौ. विशाखा सोमण, निलेश भुरवणे, सौ. कोळपे, अशोक मोहिरे, सरपंच राजू जाधव आदीसह तालुक्यातील राजकीय नेतेमंडळी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

