(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे येथील मुख्य रस्त्यावर बिबट्या चे मृतावस्थेत पिल्लू आढळून आल्याने एकच खळबळ आणि घबराट पसरली आहे. आज सकाळी असुर्डे येथील राकेश जाधव हे आपल्या चारचाकी वाहनाने या रस्त्यावरून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला बिबट्या चे पिल्लू पडलेले दिसले त्यांना ते पिल्लू निद्रावस्थेत असावे असे वाटले. म्हणून ते पुढे न जाता दूरच उभे राहिले. बराच वेळ झाला तरी त्या पिल्ला कडून कोणतीच हालचाल होत नसल्याचे पाहून ते मृत असावे अशी त्यांची खात्री झाली तर काही वेळाने त्या ठिकाणी मादी बिबट्या घिरट्या घालत होती. याची माहिती पोलीस पाटील सुभाष गुरव यांना दिल्या नुसार पोलीस पाटील यांनी वनविभागाला याची माहिती कळवली आहे.
प्रख्यात ठेकेदार राकेश जाधव हे असुर्डे रस्त्यावरून चाळकेवाडी येथे चारचाकी वाहनाने जात असताना त्यांना असुर्डे हद्दीतील रहादारीच्या मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या साईड पट्टीवर बिबट्याचे पिल्लू पडलेले दिसून आले. ते पिल्लू निद्रावस्थेत असेल व मादी तेथेच असू शकेल या भीतीने त्यांनी पुढे न जाता दूर अंतरावरच थांबण्याचा निर्णय घेतला. बराच वेळ झाला तरी त्या पिल्लाची काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून ते मृत असावे अशी त्यांची खात्री झाली. तर त्या पिल्लाच्या ठिकाणी आसपास मादी असू शकते असे त्यांना आधीच वाटले होते तेही खरेच ठरले.
ज्या ठिकाणी बिबट्या चे पिल्लू मृतावस्थेत पडून होता त्या ठिकाणी असलेल्या झाडाझूडपातुन अचानक बिबट्या मादी ने थेट त्या पिल्लाच्या ठिकाणी झेप घेतली. आणि सैरवैर त्या पिल्लाच्या अवतीभवती फिरू लागली.आपल्या पिल्लाच्या दुःखाने जणू ती मादी बिबट्या विचलित झाली होती. ती मादी रस्त्यावरही धाव घेत होती.दुःखी झालेल्या मादी बिबट्या चें वात्सल्य प्रेम पाहून राकेश जाधव यांच्या डोळ्यातून आपसुकच पाणी आले.
राकेश जाधव यांनी पुढचा प्रवास थांबवून या सर्व प्रकारणाची माहिती गावचे पोलीस पाटील सुभाष गुरव यांना दिल्या नुसार देवरुख वनविभागाला याची माहिती देण्यात आली आहे. मृत पिल्लाच्या ठिकाणी रस्त्यावर बिबट्या मादी सैरवैर भटकंती करत असल्याने या ठिकाणी घबराटीचे वातावरण पसरले आहे

