(रत्नागिरी)
शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत नावलौकिक मिळवलेल्या सौ. शशिकला अभ्यंकर (माजी मुख्याध्यापिका फाटक हायस्कूल, रत्नागिरी व परशुरामपंत अभ्यंकर मराठी शाळा) यांचे आज ( १४ ऑगस्ट) रोजी सकाळी ९.१५ वा. पुणे येथे निधन झाले.
आपल्या दीर्घ कार्यकाळात त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञानच नव्हे, तर संस्कार आणि जीवनमूल्यांचे भांडार दिले. त्यांच्या प्रेमळ व आपुलकीच्या स्वभावामुळे तसेच शिस्तप्रियता, कार्यतत्परता आणि शिक्षणावरील निष्ठेमुळे त्या विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असायचे.
त्यांच्या निधनाने रत्नागिरीच्या शिक्षणक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

