(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरीच्या संचालक मंडळाच्या वतीने दि. 23/05/2025 रोजी सकाळी10.30 वाजता पतपेढीच्या सभागृहात उपाध्यक्ष अरविंद पालकर, संचालक मनीष शिंदे, अशोक मळेकर ,राजेंद्र चांदिवडे, अमोल बोगसकर, रमेश गोताड, चंद्रकांत कोकरे, संजय डांगे, विजय खांडेकर, चंद्रकांत झगडे, सुनील दळवी, अंकुश चांगण, प्रांजली धामापूरकर, गुलजार डोंगरकर यांनी श्री. संतोष कांबळे यांची लोकशाही पद्धतीने बिनविरोध चेअरमन पदी निवड केली आहे
यावेळी शिक्षक सहकारी पतपेढीच्या गटबंधनातील सर्व मार्गदर्शक, दीपक शिंदे, प्रकाश काजवे , चंद्रकांत पावसकर, दिलीप देवळेकर, बळीराम मोरे, राजेश गमरे, प्रवीण काटकर,सर्व शिक्षक संघटनांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी मार्गदर्शक, माजी चेअरमन,माजी संचालक, माजी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे उपस्थित होते. मराठवाडा विभागाचे विभागीय अध्यक्ष राजेश सदावर्ते, कास्ट्राईब संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष सुभाष मस्के, कास्ट्राईब शिक्षक संघटना परभणी जिल्हा कोषाध्यक्ष विशाल प्रधान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिलेदारांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न झाला. साडेपाच हजार सभासद असलेल्या व 450 कोटीच्या ठेवी असलेल्या महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पतपेढीत रत्नागिरी जिल्ह्याच्या 97 वर्षांच्या इतिहासामध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधीला पहिल्यांदाच चेअरमन पदाची संधी मिळाली. हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिरपेचात मानाचा तुरा समजला जात आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कास्ट्राईब संघटनेच्या शिलेदारांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे.
संतोष कांबळे यांच्या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील गटबंधनातील सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून व सभासदाकडून संतोष कांबळे यांचे अभिनंदन केले जात आहे. त्याचबरोबर राज्यभरातूनही कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
पदग्रहण सोहळ्यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून संतोष कांबळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पदग्रहण सोहळ्या चे मुख्यअतिथी सतीश कांबळे यांनी आपल्या मनोगतात संतोष कांबळे यांना शुभेच्छा देऊन राज्य कार्यकारिणी आपल्या पाठीशी आहे असे वचन दिले. त्याचबरोबर गटबंधनातील सर्व जिल्हाध्यक्ष,सर्व संघटनांचे मान्यवर प्रतिनिधी आणि संचालक मंडळ यांनी संतोष कांबळे यांना पाठिंबा देऊन बिनविरोध चेअरमन केल्याबद्दल राज्य कार्यकारिणीच्या वतीने सर्व संघटनांचे अभिनंदन करून आभार मानले.
संतोष कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचा कारभार पारदर्शक व निपक्षपातीपणे करताना संचालक मंडळाच्या अजिंठ्यावर असलेले महत्त्वाचे विषय सर्वांना विश्वासात घेऊन ताकदीने पूर्णत्वाकडे नेणार असल्याचे सांगितले तसेच झालेल्या निवडीबद्दल उपस्थित त्यांचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कास्ट्राईब शिक्षक संघटना रत्नागिरी जिल्हा कोषाध्यक्ष संतोष पडवळकर, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा सचिव संतोष मोहिते यांनी उत्तम नियोजन केले .कास्ट्राईब संघटनेच्या वतीने मंडणगड ,दापोली ,खेड, गुहागर ,चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर,या तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी ,तालुकाध्यक्ष, सचिव, पदाधिकाऱ्याने अपार मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. यामध्ये चंद्रमणी महाडिक, प्रकाश जाधव, रवींद्र कांबळे, विजय कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली.
ठाणे सहकार कोर्टात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष विजयकुमार जाधव, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ ठाणे मनपा शिक्षक सेनेचे बाबाजी फापाळे व ठाण्याचे वकील ऍड.शिंदे यांनी न्यायालयीन प्रक्रियेसाठी विशेष मार्गदर्शन सहकार्य केल्याने विरोधकांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. या सर्वांचे व कार्यक्रम यशस्वी करणाऱ्यांचे व मान्यवर उपस्थित यांचे आभार संतोष पावने यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटबंधनातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम संपन्न झाला.