(मुंबई)
राज्यात प्रशासकीय यंत्रणेला गती देण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. गेल्या आठवड्यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता पुन्हा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्यांचे आदेश जारी झाले आहेत. यामध्ये डॉ. अशोक करंजकर, संजय कोलते, सुशील खोडवेकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बदल्या आणि नियुक्त्या:
संजय कोलते (IAS:SCS:2010): भंडारा जिल्हाधिकारी यांना शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती.
सुशील खोडवेकर (IAS:RR:2011): उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे सदस्य सचिव यांना विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई येथे नियुक्ती.
सावन कुमार (IAS:RR:2019): मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांना भंडारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
डॉ. जी.व्ही.एस. पवनदत्त (IAS:RR:2023): सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक येथे नियुक्ती.
लघिमा तिवारी (IAS:RR:2023): सहाय्यक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर येथे नियुक्ती.

